Tuesday , March 3 2026
Breaking News

चैनीसाठी आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव मधील दोघांना अटक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कोल्हापूर आणि आदमापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या बेळगाव येथील दोन चोरट्यांना निपाणी पोलिसांनी अटक केली. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१) व जोतिबा यल्लाप्पा धामणीकर (वय २३) रा. दोघेही अगसगा, ता, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत. ही कारवाई विशेष गस्त पथकाने केली.
चोरट्याकडून १ लाख, १० हजार रुपयांच्या तीन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
येथील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गवाणी क्रॉस येथे मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्लोळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. नरसपण्णावर, एम. जी. मुजावर, संजय काडगौडर, विनोद कंग्राळकर, उमेश माळगे, बसवराज नेर्ली हे गस्त घालत होते. त्यावेळी सोमनाथ मेणसे निपाणीहू बेळगावच्या दिशेने दुचाकी ढकलत नेऊन जात असल्याचे आढळून आले. संशयावरून गस्ती पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपण दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता आपला मित्र जोतिबा धामणीकर यांच्या मदतीने आणखी दोन दुचाकी कोल्हापूर व श्रीक्षेत्र आदमापूर येथून चोरल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने दोघांकडून १ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करून गुन्हा दाखल केला. सोमनाथ मेणसे हा मेकॅनिक आहे. पुढील तपास उपनिरीक्षिक एस. एस. नरसपण्णावर करत आहेत. निपाणी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *