Tuesday , March 3 2026
Breaking News

मावळ्यांच्या कार्याचा अभ्यास करण्याची गरज

Spread the love

 

श्रीमंत संजयसिंह बेनाडीकर-सरकार; नवीन संभाजीनगरात राज्याभिषेक सोहळा

निपाणी (वार्ता) : शिवकार्याचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढत असून, दुर्गभ्रमंतीच्या माध्यमातून शिवरायांच्या कार्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवप्रेमी पुढे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे. स्वराज्य उभारणीत मोलाची भूमिका बजावलेल्या मावळ्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची खरी गरज आहे, मत श्रीमंत संजयसिंह बेनाडीकर सरकार यांनी केले. येथील नवीन संभाजीनगर येथे आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
बेनाडीकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा इतिहास आजही जगासाठी आदर्शवत असून तरुणांनी त्यांच्या विचाराचे प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.
मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. यावेळी वाघापूर येथील भगवान डोणे-महाराज श्रीमंत दादाराजे निपाणकर- सरकार, श्रीमंत विजयराजे निपाणकर -सरकार व युवराज सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुनील दळवी व दीपक खापे यांनी स्वागत केले.
धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ व नारी मंडळातर्फे ११ दुरड्या अर्पण करण्यात आल्या. रात्री प्रथमेश पाटील (बुदीहाळ) यांचे शिव-शंभू विषयावरील व्याख्यान झाले. कार्यक्रमास आमदार. शशिकला जोल्ले, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, आण्णासाहेब हावले, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, राजू गुंदेशा, पंकज पाटील, शौकत मणेर, दीपक सावंत, श्रीनिवास चव्हाण, सुरज राठोड, स्वप्निल मोरे, जयवंत हावळ, सुरज चौगुले, अजय लोहार, आदित्य केसरकर, सुहास चौगुले, विशाल चव्हाण, दीपक खापे, पांडुरंग रावण, आकाश रावण, दिगंबर पारळे, शंभूराज दळवी यांच्यासह शिवप्रेमी संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *