निपाणी (वार्ता) : बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरसेवक अभयकुमार मगदूम व नगरसेविका शोभा हवले यांची बेळगावी जिल्हा प्लॅनिंग कमिटीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आण्णांचा सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी, ही निवड म्हणजे बोरगांव परिसराच्या विकासासाठीचे नवे पर्व आहे. स्थानिक नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. सार्थ ठरत आहे.त्या माध्यमातून परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्कार प्रसंगी सुकाणू समिती सदस्य बाबासाहेब वठारे, अभय करोले, अशोक पाटील, मनोज पाटील, राजू मगदूम, जंबू मुळवाडे, पिरगोंडा पाटील (नांगरे), माजी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, संगाप्पा ऐदमाळे, माजी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे यांच्यासह आजी, माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta