Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत कचरा वर्गीकरणाला नाही प्रतिसाद

Spread the love

 

प्लास्टिक कचऱ्याचीही भर; पालिकेच्या सूचनेकडे नागरिकांची पाठ

निपाणी (वार्ता) : नगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षणासाठी तयारी सुरू असताना दुसरीकडे काही महत्वाच्या गोष्टींवर अद्यापही केवळ प्रबोधन, जनजागृतीच्या रुळावरच गाडी चालल्याचे चित्र आहे. यात प्रामुख्याने कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत फारशी प्रगती होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेकडून नागरिकांना ओला-सुका कचरा स्वतंत्र देण्याचे आवाहन केले जात असले, तरी प्रत्यक्षात दारोदारी फिरणाऱ्या घंटागाड्यामध्ये स्वतंत्र कचरा देण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. तर अशातच प्लास्टिक कचऱ्याचीही भर पडत आहे.
नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील साफसफाईचे काम होते. तर प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम सुरू आहे. या कामावर सध्या नगरपालिकेतील अधिकारी समाधानी असल्याचे दिसते, पण ओला, सुका आणि प्लास्टिक कचरा वेगळा घेताना स्वच्छता कर्मचान्यांची दमछाक होत आहे. पालिका प्रशासन अजूनही जनजागृती, प्रबोधनाच्या ट्रॅकवरच आहे. प्रत्यक्ष ओला-सुका कचरा संकलनाचे काम ठळकपणे पाहायला मिळत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष सुरवात कधी होणार हा प्रश्न आहे.
——————————————————————–
* ओला, सुका कचरा संकलन करणारी १० वाहने
* नवीन ४ वाहनांचा समावेश
* जुने २ ट्रॅक्टर, नवीन २ ट्रॅक्टर
* घरोघरी कचरा संकलनासाठी २० वाहने
* घंटागाडीवर ४० कर्मचाऱ्यांचा समावेश
——————————————————————–
‘पालिकेतर्फे ओला, सुका, प्लास्टिक कचरा वर्गीकरण करून घंटागाडीला देण्यासाठी वर्षभरापासून जनजागृती सुरू आहे. अजूनही बरेच नागरिक सर्व कचरा एकत्र करून देत आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल.’
– गणपती पाटील, आयुक्त, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *