Tuesday , March 3 2026
Breaking News

बोरगांव सर्कल रुंदीकरणासाठी २.५० कोटींचा निधी

Spread the love

 

खासदार प्रियंका जारकीहोळी यांची माहिती; मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा प्रारंभ

निपाणी (वार्ता) : अनेक वर्षापासून बोरगाव सर्कलचे रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याची मागणी होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम व पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या कामासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून झालेल्या कामाचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणानंतर बोरगाव शहराला अधिकाधिक सौंदर्य प्राप्त होणार असल्याचे खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी सांगितले.
खासदार प्रियंका जारकीहोळी, आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले, सहकार रत्न उत्तम पाटील, नगरसेवक शरद जंगटे यांच्यासह अन्यमान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, बोरगाव सर्कल रुंदीकरण ही काळाची गरज होती. यासाठी आपण जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे या कामाची मागणी केली होती. सर्वांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी निधी मंजूर झाला असून सर्कल डांबरीकरण व रुंदीकरणामुळे शहराला गत वैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले.
मंजूर निधीतून सर्कल रुंदीकरणाबरोबर, डांबरीकरण होऊन रस्त्याच्या मध्यभागी हायमास लॅम्प, कीर्तीस्तंभाचे सुशोभीकरण, सर्कल परिसरात ३.५ फूट फुटपाथसह इतर कामासाठी २ कोटी ५० लाखांचा अनुदान मंजूर झाला आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी दिली.
यावेळी उत्तम पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले, सुप्रिया पाटील, पंकज पाटील, नगरसेवक शरद जंगटे, राजेंद्र पवार, हालशुगर संचालक जयकुमार खोत, रामगोंडा पाटील, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, अनुज हवले, विद्याधर अम्मन्नावर, भाऊसाहेब पाटील, नगरसेवक अभय मगदूम, राजू मगदूम, रोहित पाटील, तुळशीदास वसवाडे, मनोज पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *