Tuesday , March 3 2026
Breaking News

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे बोरगाव कृषी पत्तीन संघावर नामनिर्देशक संचालकांची निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कृषी पत्तीन संघावर नामनिर्देश संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोले यांच्या प्रयत्नाने बोरगांव येथील विवीधोद्देशिय कृषी पत्तीन संघावर नामनिर्देश संचालकांची निवड झाल्याची माहिती हालशुगर संचालक, नगरसेवक शरद जंगटे दिली.
यामध्ये विविधोद्देशिय ग्रामीण कृषी पत्तीन सहकारी संघमध्ये जितेंद्र पाटील -भोजे व राजकुमार उरणकर, जय गोमटेश कृषी संघात महादेव खोत -महाराज व ईलाई कापसे, बोरगाव पूर्व भाग ग्रामीण कृषी
संघात भाऊसाब महाजन व भरमा कुडचे, पद्मावती विविध उद्देशीय ग्रामीण प्राथमिक कृषी संघात स्वाती कुडचे व मायाक्का खोत यांची, जय गोमटेश कृषी संघात भरत जंगटे यांची तर आचार्य श्री १०८ शांतीसागर क्रेडिट सोसायटीत डॉ. महावीर बंकापूरे यांचे संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष बी. के. महाजन यांनी,बेळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले व नगरसेवक शरद जंगटे यांनी दिलेल्या संचालक पदाच्या संधीचा उपयोग शेतकरी वर्गासाठी होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास जितेंद्र पाटील, बबन रेंदाळे, अजित तेरदाळे, बाहुबली पाटील, माजी मुख्याध्यापक एस. बी. पाटील, बाळासाहेब उरणकर, शंकर गुरव, अण्णा खोत, उत्तम कदम, अजित कांबळे, भरत कांबळे, मल्लू खोत, राजू कुंभार, शंकर गुरव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *