Sunday , July 26 2026
Breaking News

संत मीरा इंग्रजी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love

 

बेळगांव : अनगोळ येथील जन कल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मैदानावर प्रमुख पाहुणे नागराज काळे शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी माधव पुणेकर, अनंतराम कल्लुराया, मुख्याध्यापका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, पूजा व प्रार्थना झाली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत विद्यार्थीनी ओवी मोरे हिने केले. यानंतर शालेय विद्यार्थ्यांनीं पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली तसेच शारीरिक कवायतींचे प्रदर्शन करण्यात आले. शिक्षिका श्रीमती पद्मनी कुलकर्णी आणि विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

प्रमुख पाहुणे नागराज काळे यांनी संविधानाचे महत्त्व व देशभक्तीचा संदेश दिला. परमेश्वर हेगडे व पूर्वी शेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतीक हंगरगी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *