निपाणी (वार्ता) : सलग तीन दिवस सराव शिबिर झाल्यावर कर्नाटक राज्य मुला मुलींचा लंगडी संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिर्डीकडे रवाना झाला आहे.संदिप मगदूम, प्रथमेश शिंदे, अनिता कोळी , शिवानंद प्रभात आणि प्रविण नरगट्टे यांच्या नेतृत्वाखाली सराव शिबिर झाले. त्याची सांगता होवू हे संघ शिर्डी – महाराष्ट्र कडे रवाना झाले आहेत.
शिर्डी येथे १५ वी सिनिअर आणि १४ वी सब ज्युनियर राष्ट्रीय लंगडी स्पर्धा होणार आहे. शिबिरास बेळगावी जिल्हा लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी भेट देऊन खेळाडूना शुभेच्या दिल्या. तर लंगडी फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, कर्नाटक राज्य लंगडी असोसिएशनच्या अध्यक्षा आमदार शशिकला जोल्ले यांनी मोबाईलद्वारे खेळाडूंना शुभेच्या दिल्या. यावेळी प्राचार्या नंदा चुरमुरे, जोल्ले एजुकेशनचे को ऑर्डीनेटर एम. एम. पाटील, माणिक शिरगुप्पे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सब ज्युनियर मुलांच्या गटात म्हाळू बोरगुंडे -कर्णधार, नागराज दड्डीमनी-उप कर्णधार, अरहन बागी, असद अम्मनगी, प्रज्वल कुरी, वीरभद्र अम्मनगी, अजयकुमार तळवार, राम भानसे, आशिफ खानापुरे, वाहाफ गवंडी, प्रज्वल इंगळे, योगनाथ हिरवे, प्रशिक्षक प्रथमेश शिंदे , संघ व्यवस्थापक शिवाप्पा हडकर,
सब ज्युनियर मुलींच्या संघातऐश्वर्या नराटे- कर्णधार, अमृता हिरेमठ -उप कर्णधार, स्नेहा भानसे, अन्नपूर्णा पुजारी, सरस्वती भाणसे, लक्कव्वा पुजारी, सरस्वती हनगंडी, अंजली खोत, रत्ना मगदूम, सिद्धी गिरगावे, सृष्टी मोहिते, पूर्वा खोत, प्रशिक्षक महादेव कोरव, संघ व्यवस्थापक अनिता कोळी यांचा समावेश आहे.
सिनियर मुलांच्या संघात मुरसिद्धाप्पा सुनाधोली – कर्णधार, राहुल चिपलकट्टी- उपकर्णधार, अभिलाश हरिजन, जगदीश तळवार, सुनील गडगली, मंजेश सुनगार, आकाश नाईक, विनायक कांबळे, शिवानंद गस्ती, दर्शन सत्त्यापगोळ,राजू नाईक, मल्लिकार्जुन चौगुले, संघ व्यवस्थापक, बाबालाल गवंडी यांचा सहभाग आहे. संघ लंगडी फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि राज्य लंगडी असोसियएशनचे जनरल सेक्रेटरी माणिक शिरगुप्पे यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंची निवड झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta