Sunday , July 26 2026
Breaking News

ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा आणि मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील मुख्य व शहराबाहेरील सर्व रस्त्यांवरील स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नगरपालिकेचे १०९ कर्मचारी आणि १८ वाहनांद्वारे हे काम सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसात शहरातील संपूर्ण स्वच्छता होणार असल्याची माहिती नगरपालिका आयुक्त गणपती पाटील आणि अभियंते विनायक जाधव यांनी दिली.
ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवारपासून (ता.३ फेब्रुवारी) प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त आठवडाभर चालणाऱ्या यात्रा महोत्सवासाठी निपाणीसह सीमा भागातील भाविकांची गर्दी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि प्रशासनाची बैठक होऊन स्वच्छतेसह विविध उपायोजना करण्याची सूचना खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केली होती. त्यानुसार नगरपालिका प्रशासनातर्फे स्वच्छतेच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. येथील मुरगुड रोडवरील सद्गुरु बाळूमामा बाळूमामा प्रवेशद्वारापासून बस स्थानक, धर्मवीर संभाजीराजे चौक, चिक्कोडी रोडवरील बागवान ओढ्यापर्यंत जेसीबी व नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यातर्फे ही मोहीम राबविली जात आहे. याशिवाय अक्कोळ क्रॉस ते हालसिद्धनाथ मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिक वर इतर कचरा हटविला जात आहे. तसेच गुरुवार पेठ, महालक्ष्मी मंदिर, महादेव मंदिर, महात गल्ली, बागवान गल्लीसह बौद्ध नारातील रेणुका मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. येत्या दोन दिवसात शहरातील रस्त्यावरील कचरा आणि गटारींच्या स्वच्छतेचे काम पूर्णत्वाकडे जाणार आहे. याकामी हिम्मतसिंग राजपूत, आकाश वाघेला, विशाल मधाळे यांचे सहकार्य लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *