Sunday , December 14 2025
Breaking News

रुग्णवाहिका निपाणी भागासाठी आधार ठरेल

Spread the love

युवा नेते उत्तम पाटील : ‘अरिहंत’तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय अनेक रुग्णांना रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. ही बाब लक्षात घेऊन बोरगाव आणि निपाणी येथे अरिहंत उद्योग समूह आणि पीकेपीएसतर्फे तात्पुरती रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनची सोय केली होती. त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला. ही बाब लक्षात घेऊन यापूर्वी बोरगाव येथे पीकेपीएसतर्फे अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सोय केली आहे त्यानंतर आता निपाणी येथे अरिहंत उद्योग समूहातर्फे रुग्णवाहिका पुरविली आहे. ही रुग्णवाहिका निपाणी भागासाठी आधार ठरेल, असे मत युवानेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्योगपती अभिनंदन पाटील यांच्या सहकार्याने उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने बोरगाव अरिहंत उद्योगसमूहातर्फे नव्यानेच सेवा देणारी रुग्णवाहिका सुरू झाली. या रुग्णवाहिकेचे गुरुवारी (ता.३) विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उत्तम पाटील बोलत होते. यावेळी उद्योगपती अभिनंदन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार लखन जारकीहोळी यांनी, निपाणी परिसरातील गावांमधील रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळावी. महिला प्रसूतीसाठी ग्रामीण भागातून शहरी भागात महिलांना सुखरूप पोहोचवता यावे. कोरोना संसर्गातून निर्माण होणाऱ्या रुग्णांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिका सुरू केली आहे. शिवाय या भागातील होणाऱ्या अपघातावेळीही रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अशोककुमार असोदे, निरंजन राजीव पाटील, इंद्रजीत सोळांकुरे, सुंदर पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, संजय पावले, शौकात मनेर, दत्ता नाईक, दिलीप पठाडे, शेरू बडेघर, बोरगावचे नगरसेवक अभय मगदूम, माणिक कुंभार, प्रदीप माळी, दिगंबर कांबळे, रोहित माने -पाटील, पिंटू कांबळे, वर्षा मणगुत्ते, संगीता शिंगे, अश्विनी पवार, गिरीजा वठारे, व्यवस्थापक आर. टी. चौगुले, अशोक बंकापूरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सबसिडीच्या दरात कृषी अवजारे
युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात शेतकऱ्यांसाठी सबसिडीच्या दरात कृषी अवजारांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. याशिवाय महिला उद्योगासाठी असलेली उपकरणेही प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्याला निपाणी भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *