साहित्यिक योगीराज बागुल ; वराळे फाउंडेशनतर्फे निपाणीत कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निपाणी शहराला बऱ्याचदा भेटी दिल्या आहेत. या काळात त्यांनी बळवंत वराळे यांच्या निवासस्थानी वास्तविक केले आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन वराळे यांनी बेळगाव जिल्ह्यात दलित समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे
आंबेडकर आणि वराळे यांना समाजा बाबत तळमळ असल्याने या दोघांची मैत्री टिकून होती. त्यांच्या विचारानुसार समाज बांधवांनी वाटचाल करावे, असे आवाहन मुंबई येथील जेष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत योगीराज बागुल यांनी केले. येथील बी. एच. वराळे फौंडेशनतर्फे बळवंत वराळे यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त येथील डॉक्टर आंबेडकर भवनमध्ये आयोजित व्याख्यानासह सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी देवचंद महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. डॉ. जे. डी. कांबळे होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर, बळवंत वराळे यांच्या प्रतिमेसह गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन झाले. डॉ.श्रीकांत वराळे यांनी स्वागत केले.
कोल्हापूर येथील निवृत्त प्राचार्य हरीश भालेराव यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत राहुल बळवंत वराळे यांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. याशिवाय समाज प्रबोधन करून त्यांच्यावर अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. प्रा. जे. डी. कांबळे यांनी, बळवंतराव वराळे यांनी निपाणी भागात समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
बेळगाव येथील मल्लेश चौगुले, दलित क्रांती सेनेचे अशोककुमार असोदे, प्रा. उल्हास वराळे, सुरेश कांबळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा फाउंडेशन तर्फे सन्मान झाला.
कार्यक्रमास प्रा.एन. डी. जत्राटकर, ऍड. अविनाश कट्टी, प्रा. एन. डी. जत्राटकर, बळवंतराव वराळे फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रीकांत वराळे, सुधाकर माने, मोहन घस्ते, हिटलर माळगे, अशोक लाखे, अमित शिंदे, रवींद्र श्रीखंडे, किसन दावणे, कबीर वराळे यांच्यासह निपाणी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. फाउंडेशनचे सेक्रेटरी ऍड. राहुल वराळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta