
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची रविवारची यात्रा आणि नूतन मंदिराचा वास्तुशांती सोहळ्याला मंगळवारपासून (ता.३) सुरूवात झाली आहे. ही यात्रा बुधवारपर्यंत (ता. ११) साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात शहर आणि उपनगरातील दळप, कांडप गिरण्या बंद राहणार आहेत. या काळात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन निपाणी शहर गिरणी चालक-मालक संघटना असोसिएशनचे अध्यक्ष विनोद बल्लारी यांनी केले आहे.
शहर व उपनगरात सुमारे ५० पेक्षा अधिक गळप कांडपाच्या गिरण्या आहेत. शुक्रवार (ता.६), शनिवार (ता.७ ) आणि रविवारी (ता. ८) विविध धार्मिक उत्सव व विधी गांधी चौकातील नूतन महालक्ष्मी मंदिरात पार पडणार आहेत. यादिवशी महत्त्वपूर्ण धार्मिक विधी होणार असल्याने असोसिएशनने मंदिर कमिटीच्या सूचनेनुसार शहर आणि उपनगरातील सर्व दळप कांडप गिरण्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta