Tuesday , March 3 2026
Breaking News

ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने यरनाळमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यरनाळ (ता.निपाणी) येथील ग्रुप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानिमित्त अंमलझरी येथील ग्रामपंचायत सदस्य अभिजित कौंदाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह व देऊन सन्मानित केले. अध्यक्षस्थानी येथील माजी नगरसेवक संजय पावले होते.
सचिन कौंदाडे यांनी, ग्रामपंचायत सदस्य हे पाच वर्षे कालावधीपुरते असतात. पण कर्मचारी हे सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतात. अशा कर्मचाऱ्यांना समजून घेऊन समाजात प्रामाणिक काम करणे हे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याचे कर्तव्य आहे. कर्मचाऱ्यामुळेच गावच्या सुधारणा सह विकासात भर पडत असल्याचे सांगितले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या पुढील काळातही गावासाठी निरंतरपणे कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे कर्मचारी भालचंद्र पाटील, गोरखनाथ मधाळे, उदयकुमार कांबळे, पांडुरंग डावरे, हनुमंत पवार, यल्लाप्पा कांबळे, रघुनाथ डावरे, महादेव कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. रावसाहेब यमकनमर्डे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *