Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीतील आमराईमधील रेणुका देवीची यात्रेत भाविकांची गर्दी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील भाविकासह येथील श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर -सरकार घराण्यातर्फे सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा पार पडली. यात्रा आटोपून आल्यानंतर बुधवारी (ता.४) येथील बौद्ध नगरातील आमराई मधील रेणुका मंदिरात गडकरी यात्रा साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दर्शनासाठी शहरासह उपनगरातील भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती.
श्रीमंत सिद्धोजीराजे घराण्यातर्फे मानाचा जग बैलगाडीतून सौंदत्तीकडे रवाना झाला होता. तेथे दोन दिवस देवीला अभिषेक, नैवेद्य व विविध कार्यक्रम आटोपून ही यात्रा निपाणी दाखल झाली. बुधवारी पहाटे श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत राजलक्ष्मी राजे यांच्या हस्ते विधिपूर्वक मंदिरातील रेणुका देवीच्या मूर्तीला विधिपूर्वक अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवीची अलंकृत ओटी भरून पूजा बांधण्यात आली. त्यानंतर मानक-यासह भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. दुपारी १ वाजता निपाणकर राजवाड्यामधून सवाद्य मिरवणुकीने भाकरी,भाजी आणि आंबिलाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडला. सायंकाळी श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार यांनी कापूर लावून यात्रेची सांगता केली. यावेळी श्रीमंत विजयराजे निपाणकर-सरकार यांच्यासह शहरातील मान्यवर मंडळी, भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *