Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा उत्साहात प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘Elites Annual Sports meet 2025-26’ या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ८ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने आणि क्रीडांगणावर दिसणाऱ्या उत्साहाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांच्या हस्ते पूजा करून तसंच क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. नागेश सी. यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी क्रीडेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असे मत व्यक्त केले.
या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध मैदानीखेळांचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. आज व उद्या अशा दोन दिवसांत या स्पर्धा पार पडणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य,डॉ. विष्णू कंग्राळकर, उप-प्राचार्य डॉ. नागेश सी, तसेच क्रीडा प्रमुख डॉ. महेश भानुशाली, क्रीडा समन्वयक डॉ. अनिल कुसनूर, डॉ. देविका कोटेकर, प्रा. राधिका पाटील याच बरोबर काँलेजचे सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *