
निपाणी (वार्ता) : येथील महात्मा गांधी रुग्णालयासमोर गणेश मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचा वास्तुशांती सोहळा, मूर्ती प्रतिष्ठापना आणि मूर्ती कार्यक्रम शुक्रवारी (ता.६) सकाळी पार पडला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे सहा वाजता उदय यरनाळकर यांच्या पौरोहित्याखाली चन्नबसाप्पा नरेगल, संगीता नरेगल दाम्पत्य आणि मालाश्री करडीमठ यांच्या हस्ते होम हवन आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर भगवान गिरी महाराज व मान्यवरांच्या हस्ते कळसारोहन झाले. यावेळी भाविकांच्या हस्ते गणेशाला अभिषेक आणि आरती करण्यात आली.
मंदिरातील मूर्तीअडीच फूटाची असून येथील पंत मंदिरापासून स्वावाद्य मिरवणुकीने मूर्ती आणण्यात आली. यरगट्टी येथील मूर्तिकार महादेवाप्पा यांचा गणेश मंदिर तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी चिक्कोडी येथील अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी शरणाप्पा गडेद, डॉ .ईश्वर पत्तार, डॉ.गणेश चौगुले, डॉ. सीमा गुंजाळ, माजी नगरसेवक संजय पावले, अजित बक्कनावर, डॉ. प्रणव देशपांडे, डॉ. मोहन कालेकर, दीपक माने, विजय टवळे, अरुण आवळेकर, आकाश माने, महेश चचडी, शब्बीर हुकेरी, गीता बागेवाडी, प्रतिभा पाटील, सुमंगल हणबर यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta