Monday , September 21 2026
Breaking News

निपाणी महादेव मंदिरात १५ रोजी महाशिवरात्री

Spread the love

 

विविध कार्यक्रमांचे आयोजन ; १८ रोजी रथोत्सव मिरवणूक

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महादेव गल्लीतील पुरातन महादेव मंदिरात रविवारी (ता.१५) महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त गुरुवारपासून (ता.१२) विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची महाशिवरात्री उत्सव कमिटीकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. या सोहळ्याची मुहूर्तमेढ झाली असून मंदिरासमोरच भव्य अशी महादेवाची पिंडी उभारले असून यंदाच्या महाशिवरात्रीचे ते खास वैशिष्ट्ये आहे.
गुरुवारी (ता.१२) रात्री ८ वाजता लोककला जागराचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (ता.१३) दुपारी ४ वाजता खुल्या मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत. त्यातील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार, ९ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. रात्री ८ वाजता ‘न समजलेले आईबाप’ या विषयावर डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (ता.१४) रात्री समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत. त्यामधील विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ९ हजार, ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहेत. रविवारी (१५) महाशिवरात्री साजरी होणार आहे. त्यानिमित्त महादेव मंदिरात फुले व फळांची सजावट केली जाणार आहे. सोमवारी (ता.१६) रात्री ८ वाजता रूपालीताई सवणे -परतुरकर यांचे कीर्तन. बुधवारी (ता. १८) दुपारी १ वाजता रथोत्सव मिरवणूक काढली जाणार आहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या महाशिवरात्री सोहळ्यास शहर व परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाशिवरात्री उत्सव कमिटीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *