Monday , September 21 2026
Breaking News

वेदांत हलगेकर, विराज हलगेकर यांचे कराटे स्पर्धेत यश

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे कराटे खेळाडू विराज विनायक हलगेकर व वेदांत विनायक हलगेकर यांनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
म्हापसा गोवा येथे शोटोकान कराटे डु संघटनेच्या मान्यतेने नुकत्याच झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात वेदांत हलगेकरने कटाज व सुवर्ण व फाईटमध्ये रौप्यपदक तर 10 वर्षाखालील मुलांच्या गटात विराज विनायक हलगेकर यांनी कटाज व फाईट या दोन्ही प्रकारात 2 सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, तसेच नुकत्याच उडपी येथे उडपी बुडोकान स्पोर्ट्स कराटे कर्नाटक आयोजित कराटे स्पर्धेत वेदांतने कटाज व फाईटमध्ये 2 सुवर्ण तर विराज हलगेकरने कटाज फाईटमध्ये 2 सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या खेळाडूंना कराटे प्रशिक्षक आकाश बडगेर यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, पालक विनायक हलगेकर व आई सुलभा यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *