Monday , June 1 2026
Breaking News

अ.भा. हॉकी स्पर्धेसाठी बेळगावचा संघ नवी दिल्लीला रवाना

Spread the love

 

बेळगाव : भारत सरकारच्या क्रीडा खात्यातर्फे नवी दिल्ली येथे दि. 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान आयोजित नॅशनल हाॅकी चॅम्पियनशिप -2026 या अखिल भारतीय पातळीवरील हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हॉकी बेळगाव संघटनेचा मुला -मुलींचा संघ दिल्लीला रवाना झाला आहे.

सदर राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धा नवी दिल्ली येथील राजीव गांधी क्रीडांगणावर खेळविली जात आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बेळगावच्या मुलींच्या संघामध्ये प्राजक्ता निलजकर, भावना किलारकी, विजयालक्ष्मी मुलीमनी, खुषी गुरव, वैष्णवी मावळणकर, नेत्रा गुरव, संपदा कणबरकर, मनीषा शिगीहळ्ळी, सुकृती कासार, प्रतीक्षा गुरव, निकिता कावळेकर, प्रणाली डुकरे, भूमि कुगजी, अनिता पम्मार, बीबीजाहिरा मुल्ला, सुकृती हिरेमठ, निधी पाटील, संजोता चौगुले, यशिका कराडे व निर्मला मल्लडी यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या संघांमध्ये प्रशांत कराडे, चेतन दोडमनी, सागर बबली, शशांक कुरपे, श्लोक मराठे, अभिषेक कोकणी, आनंद भांटे, पुनीत कग्गणगी, मंजुनाथ नाईक, निखिल बागडी, प्रेम पितांबी, अभिषेक दोडमणी, आदर्श आमटी, सुरज हुडेद, गणेश कोरे, शुभम नायक, दर्शन बस्तवाड, यश पाटील, दर्शन नंदेश्वर, विवेक संगणनावर, मल्लिकार्जुन दरेनावर, वरूण कोलकार व विशाल कोलकार यांचा समावेश आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी या दोन्ही हॉकी संघांना हॉकी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सरचिटणीस सुधाकर चाळके व उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी शुभेच्छा देऊन सुयश चिंतले. याप्रसंगी संघ व्यवस्थापक सविता वेसणे, प्रशिक्षक राजू यल्लाप्पा देशनूर, उत्तम शिंदे, संतोष दरेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

किमान वेतनवाढीचा दुरुस्ती आदेश रद्द करण्यासाठी उद्योजकांचा मोर्चा

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारने कामगारांच्या किमान वेतनात केलेल्या वाढीच्या दुरुस्ती आदेशाविरोधात बेळगावातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *