
बसफेऱ्यांमध्ये कपात; विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मनस्ताप
निपाणी (वार्ता) : वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाकडून नव्या बसेस वाढवण्याची घोषणा होत असली तरी निपाणी आगारात प्रत्यक्षात चित्र निराशाजनक आहे. एसटी बसच्या तीव्र तुटवड्यामुळे व जुन्या बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या यात जत्रा सुरू असल्याने प्रासंगिक करारावर बस सोडल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्यांमध्ये कपात केल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांना तासनतास बसस्थानकावर प्रतीक्षा करावी
लागत असून, हाऊसफुल्ल बसेसमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे.
येथील आगारासाठी अवश्य पेक्षा बस व्यवस्था कमी आहे. काही महिन्यांपूर्वी पाच नवीन बसेस मिळाल्या होत्या. मात्र नादुरुस्त बसेस व दुरुस्तीचा अभाव, जुने वाहनांचे सुटे भाग उपलब्ध नसल्याने काही बसेस भंगारात जमा होत आहेत. या परिस्थितंचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व नियमित प्रवाशांना बसत आहे. एसटीच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होत असल्याची भावना व्यका होत आहे.
‘शहरात शाळा, महाविद्यालये, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, बँका, दवाखाने व इतर शासकीय, निम शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी ग्रामीण भागातील लोकांची मोठी रेलचेल असल्याने प्रवाशांना बसची वाट पहावी लागते. त्यामुळे आधार प्रमुखांनी नवीन बसेसची मागणी करण्यासह बसची दुरुस्ती करून वेळेवर बस सोडण्याची मागणी प्रवासी देवधन माळगे यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta