Tuesday , March 3 2026
Breaking News

राजकीय इर्षेपेक्षा समाजकारण महत्त्वाचे : सहकाररत्न उत्तम पाटील

Spread the love

 

बोरगाव येथील गोंधळी समाजाचा पक्षप्रवेश

निपाणी (वार्ता) : केवळ जनतेच्या पाठींब्यामुळे निपाणी मतदारसंघांमध्ये कोणतीही सत्ता व पाठिंबा नसताना स्वतःचा गट तयार करून अस्तित्व निर्माण केले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि मतदार हिच आपली ताकद आहे. बोरगावातील गोंधळी समाजाने काम करण्यासाठी बळ दिले आहे. त्यांच्यमागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून समाजाच्या वस्तीत पाणी, गटारी, रस्ते पथदिपसह मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नगराला दिवंगत रावसाहेब पाटील (दादा) नगर करण्याचा आपण संकल्प केला. तो कौतुकास्पद आहे. राजकीय इर्षेपेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे, असे मत
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील गोंधळी समाज व बुडग जंगम समाजातील शेकडो नागरिकांनी युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे होते.
नारायण आडेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोंधळी व बुडग जंगम समाजातील नागरिकांनसह कार्यकर्त्यांनी उत्तम पाटील यांच्या समवेत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. नगराध्यक्ष दिंगबर कांबळे यांनी, चार वर्षात बोरगावचा विकास केला म्हणणाऱ्या नेत्यांना मागासवर्गीय गोंधळी व बुडग जंगम समाजाच्या समस्या सोडवलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून हा समाज नागरी सुविधा पासून वंचित आहे. उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने या समाजाला अनेक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी राजू संकन्नावर, नारायण आडेकर, काकासाहेब वाघमोडे, नगरसेविका शोभा हवले, अभय मगदूम, तुषार कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजू मगदूम, अशोक माळी,पिंटू कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, राजू पाटील, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पोवार, गिरीजा वठारे, संगीता शिंगे, मनोज पाटील, जयपाल नागावे, जावेद मकानदार, पिरगोंडा पाटील,अमर शिंगे, दादासो वाघमोडे, कुमार इंगळे, सागर वाघमोडे, संजय वाघमोडे, पांडुरंग आडेकर, भीमा वाघमोडे, सुरेश इंगळे, बाबुराव वाघमोडे, सदाशिव वाघमोडे, परशुराम संकण्णावर, मारुती कोंडुरे, नागेश संकण्णावर, दुर्गाप्पा कोंडुरे, कृष्णा संकण्णावर यांच्यासह कार्यकर्ते व समाजातील महिला पुरुष उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *