Sunday , September 20 2026
Breaking News

एपीएमसी पोलिसांकडून दुचाकी चोरांना अटक; ५ दुचाकी जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन चोरांना अटक केली आहे. सैफअली शेरअली नागार्जी (२५), नेहान उर्फ ​​अनीश मुशीन मुजावर (१८) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.

चोरांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १,२५,००० रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे आणि तपास सुरू आहे.

बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी पीआय यू. एस. अवटी, पीएसआय एस. आर. मुथटी, एएसआय कर्मचारी एम. ए. पाटील, बसवराज नरगुंद, खादरसाब खानम्मनार, गोविंदप्पा पुजार, रफीक मुजावर, रमेश पाटील आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी रमेश अक्की आणि महादेव आदींचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *