Tuesday , March 3 2026
Breaking News

बोरगावमधील तलवार मळ्यात म्हसोबा यात्रा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील तळवार मळ्यातील श्री म्हसोबा देवाची यात्रा पार पडली. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त सकाळी म्हसोबा मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी मंदिराला भेट देऊन देवदर्शन घेतले. यावेळी म्हसोबा मंदिर कमिटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पट्टणपंचायत अध्यक्ष दिगंबर कांबळे, तुळशीदास वसवाडे, अभय मगदूम, संजय कोळी, प्रकाश कोळी, महादेव कोळी, सर्जेराव कोळी यांच्यासह कोळी समाज बांधव व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *