
नगरपालिकेची अनेक भंगार वाहने धुळखात; इंधनावर महिन्याला लाखोंचा खर्च
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील स्वच्छतेचा भार नगरपालिकेवर आहे. यासाठी पालिकेकडे एकूण ३२ घंटागाड्या आहेत. मात्र या घंटागाड्या अपुऱ्या असल्याचे नवीन घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे, स्वतः पालिकेचाच अक्कोळ क्रॉसवरीर परिसर अस्वच्छ झाला आहे. मागील वर्षभरापेक्षा काळापासून पालिकेच्या या आवारात भंगार झालेल्या घंटागाडया पडून आहेत. विशेष म्हणजे काही भंगार वाहनामध्ये कचरा तसाच साठून असल्याने ‘नगरपालिका आवार की भंगार वाहनांचा डेपो’, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरात दररोज सुमारे ८ ते १० टन कचरा निर्माण होती. पालिकेकडून सध्या १४ घंटागाड्यासह ट्रॅक्टर, टिप्परच्या माध्यमातून दररोज सुमारे ५ ते ८ टन कचरा उचलत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र तरीही शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर कचरा पडून राहत आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेचा भार पेलण्यात पलिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
राजा शिवछत्रपती संस्कृतीक भवना जवळील नगर पालिकेचा आवार वैकुंठ रथ, खराब झालेला पाण्याचा टँकर, कालबाह्य झालेले फिरते शौचालय, नगरपालिकेच्या पाण्याच्या इंजिन, मोटार अशा भंगार वाहनांनी व्यापून गेला आहे. अनेक वर्षे ही वाहने पडून असल्याने ती गंजत चालली आहेत. तब्बल २० नादुरुस्त झाल्यानंतर ही वाहने पालिकेच्या आवारात पार्क करण्यात आली असून त्यांच्याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. नगरपालिकेचे अधिकारी स्वतःच्या परिसरातील कचरा काढू शकत नसतील तर शहराच्या स्वच्छतेचे काय होणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारता जात आहे. शिवाय कचरा उचलण्यासाठी इंधनावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च केले जात आहेत. तरीही शहर अस्वच्छ असल्याने हा खर्च वाया जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
——————————————————————–
कचरा संकलनासाठी १४ घंटागाड्या
घरोघरी जाऊन कचरा संकलनाठी दररोज १४ घंटागाड्या सुरू तर ८ घंटागाड्या बंद आहेत. काही घंटागाडीमुळे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात दररोज शहर आणि उपनगरातील कचरा उचलणे कठीण आहे. काही उपयोगात घंटागाड्या येत नसल्याच्या तक्रारी ही वाढल्या आहेत.
——————————————————————–
‘नादुरुस्त वाहनांचे सुटे भाग मिळत असल्याने त्यांची दुरुस्ती करणे कठीण झाले आहे. शिवाय बऱ्याच वर्षापासून ही वाहने पडून असल्याने त्यांचा काहीच उपयोग होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देऊन भंगार वाहनांचा लिलाव करण्याबाबत चर्चा केली जाईल.’
-गणपती पाटील, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta