
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील शिवालयामध्ये महाशिवरात्रीनिमित्त हर, हर महादेवाचा गजर झाला. शिवाय दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना केळी आणि शाबू खिचडीचे वाटप करण्यात आले. येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी भेट देऊन महादेवांचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे, शौकत मनेर, संजय पावले, इमरान मकानदार, ओंकार शिंदे, अरुण भोसले, अमित शिंदे यांच्यासह विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते. येथील प्रगती नगरातील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक पूजा असे कार्यक्रम पार पडले. अंमलझरी रोडवरील स्वयंभू शिवलिंग मंदिरात चव्हाण परिवारातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सोमवारी दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कुन्नूर येथील तावदारे वाड्यातीलश्री शंभू महाराज देवस्थान येथे महाशिवरात्र निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम कोल्हापूर येथील सेवा केंद्राचे ब्रम्हकुमार रघुनाथ भाईजी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी तावदारे वाड्यास भेट देऊन देवदर्शन घेतले. यावेळी प्रा.डॉ. राकेश तावदारे यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
महाशिवरात्री निमित्त अंमलझरी येथील महादेव मंदिराला उत्तम पाटील यांनी भेट देऊन भगवान महादेवांचे घेतले. शिवाय परिसरात सुख-समृद्धी, शांतता व जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उत्तम पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अभिजित कौंदाडे, सचिन कौंदाडे, मल्लू कंकणवाडे, वसंत रेपे, कुमार कंकनवाडे, चंद्रकांत खोत, रवी मोहिते, राजेंद्र कौंदाडे, बाळू लुगडे, रमेश कंकनवाडे, सुरज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बोरगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमास सहकार रत्न उत्तम पाटील यांनी उपस्थिती दर्शवून महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी बोरगाव पट्टणपंचायत अध्यक्ष दिगंबर कांबळे, नगरसेवक प्रदीप माळी, अभय मगदूम, अशोक माळी यांच्यासह नगरसेवक व भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta