

निपाणी (वार्ता) : कुन्नूरसारख्या ग्रामीण परिसरातून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सुदर्शन आप्पासाहेब मगदूम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे
त्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये मंडल कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत असून मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे ध्येय साध्य करता येत असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले. यावेळी चेतन चेंडके, शिवाजी निकम, राजू कोळी, संतोष कोळी, विलास पाटील, माणिक कांबळे, पोपट जाधव, जितेंद्र चेंडके, वरूण कुलकर्णी, रामचंद्र करडे, विजय हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शेंडूर येथील रोहित तोडकर यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सहकार रत्न उत्तम आण्णा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
देशसेवेची प्रेरणा घेऊन सैन्य दलात दाखल झालेल्या रोहित तोडकर यांचा हा गौरव शेंडूर गावासाठी अभिमानास्पद क्षण ठरला. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व देशसेवेसाठी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शेंडूर येथील उत्तम पाटील युवा शक्तीचे कार्यकर्ते व पदाधिकारी, ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.


Belgaum Varta Belgaum Varta