Friday , April 17 2026
Breaking News

बेळगावात ‘अक्का पथका’चा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : महिलांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता या ध्येयाने राज्यभरात आज ‘अक्का पथक’ या विशेष मोहिमेचा बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

कर्नाटकच्या ३१ जिल्ह्यांत आणि ५ पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात हे पथक कार्यरत राहणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि गृह विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत असून, हे पथक शाळा-महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त घालणार आहे. याप्रसंगी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, “जेव्हा महिला रात्री १२ वाजताही निर्भयपणे फिरू शकतील, तेव्हाच देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येईल.” महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी १८१ आणि १०९८ हे हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. संकटकाळात महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या दोन मिनिटांत अक्का पथकाचे सदस्य मदतीला धावून येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली या योजनेला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी अर्थसंकल्पात या पथकाचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *