
निपाणी : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या परिवहन मंडळाकडून चक्क मुतारी वापरासाठी मात्र दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार निपाणी बस स्थानकात समोर आला आहे. निपाणी बस स्थानक परिसरात महिला आणि पुरुषांसाठी मोफत मुतारी वापर असल्याचा बोर्ड लावण्यात आलेला असून देखील महिला प्रवाशांकडून दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निपाणी बस स्थानकाच्या भिंतीवर पुरुष आणि महिलांसाठी मोफत मुतारी वापर असा स्पष्ट उल्लेख असताना प्रत्यक्षात मात्र तिला प्रवासांकडून पैसे आकारले जात आहेत. पुरुषांना मोफत सुविधा दिली जात असताना महिलांकडून पैसे आकारले जात असल्याने महिला प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून देखील पैसे वसुलीचा प्रकार सुरू असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ संबंधितांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महिला प्रवासी नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अन्यायकारकरीत्या पैसे आकारले जाणे हे नियमबाह्य असून प्रशासनाच्या नियमानुसार प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta