Monday , June 1 2026
Breaking News

लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी दिल्यास शेतकरी माफ करतील

Spread the love

 

राजू पोवार; शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणे चुकीचे

निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी अखेर शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. परंतु शेतकऱ्यांनी माफ करावे असे वाटत असेल तर जोल्ले यांनी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांऐवजी १ लाखाचे बिनव्याजी पीककर्ज द्यावे.अशी मागणी रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केली.
पोवार म्हणाले, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी कर्जामुळेच जिल्हा बँक तोटयात येत असल्याचे विधान बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष जोल्ले यांनी केले होते. याबाबत रयत संघटनेने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कर्नाटकात वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
रामदुर्ग येथे जिल्हा बँकेच्यावतीने आयोजित कृषी पतीन सेवा सोसायटीच्या कार्यक्रमात रयत संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा धसका घेऊन जोल्ले यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
यापुढील काळात सर्वच जबाबदार व्यक्तींनी जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरताना विचार करून शब्द वापरावेत.चार वर्षांत बी बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते, मजुरी, मशागतीसह उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गरजा भागविताना नाकेनऊ येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख जाणाऱ्या बँकेकडून एकरी ४० हजार ऐवजी एक लाख बिनव्याजी पीककर्ज देण्यात यावे, अशी मागणी पोवार यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *