Sunday , July 26 2026
Breaking News

हर, हर महादेवाच्या गजरात निपाणीत महादेवाचा रथोत्सव

Spread the love

 

रात्री उशिरापर्यंत मिरवणूक ; भाविकाकडून रथोत्सवात जल्लोष

निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील आराध्य दैवत महादेव गल्ली महादेव मंदिराचा रथोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या अलोट उत्साहात हर.. हर महादेवाच्या अखंड गजरात हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला.श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार, बसवराज चंद्रकुडेयांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रथात बसण्यासाठी विविध मानाचे सवाल झाले. मानक-यांच्या हस्ते लोखंडी पार लावून रथोत्सवाची सुरूवात करण्यात आली. रथ मिरवणूक महादेव मंदिर येथून सुरू झाली. तेथून रविवार पेठ, गुरूवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, दलाल पेठ, मार्गे पुन्हा मंदिराच्या ठिकाणी आली.

रथोत्सव मार्गात रथाचे भाविकांनी जल्लोषात स्वागत केले. रथोत्सव मिरवणूक तब्बल १० तासाहून अधिक काळ सुरू होती. यावेळी देवास पहिला हार घालणे, कापूर, लावणे, नारळ फोडणे, डावी व उजवी बाजू नारळ वाढविणे, चौरी धरणे यासह विविध सवाल बोलण्यात आले. यावेळी झालेल्या
विविध सवालांमध्ये प्रथमेश केस्ती, प्रतीक पाटील, गुंडू चंद्रकुडे, प्रवीण शिंदे, निपुण कुरणे, चिंतामणी वाळवे, उमेश गंथडे, महेश नाईक, सुरज पाटील चिंचलीकर, ऍड. महेश दिवाण, रविंद्र शेट्टी, आकाश भोपळे, योगेश पोतदार, अनिकेत कोळके, सुरज काशीदकर, साई खोत, डॉ. महेश ऐनापुरे, रवी चंद्रकुडे, विनोद मगदूम यांनी सहभाग घेतला.

यावेळी रथोत्सवात हत्ती, घोडे, जमखंडी बॅण्ड, बेडकीहाळ बॅण्ड, करडी ढोल, करोशी ढोल, धुळगनवाडी करडी ढोल, कोथळी करडी ढोल, श्रीहनुमान संभळा – भाविकांच्या लवाजम्यासह महादेव स्थ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्थास नारळ, ऊस, केळी व आकर्षक फुलांनी सजविले होते. जमखंडी येथील वाद्यासह हजारों विविध मुखवटे घालून मिरवणूकीत नृत्य करणाऱ्या व्यक्ती नागरीकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
याप्रसंगी खासदार प्रियांका जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चंद्रकांत कोठीवाले, बसवप्रसाद जोल्ले, अमर बागेवाडी, रूद्रकुमार कोठीवाले, रविंद्र कोठीवाले, संजय मोळवाडे, विलास गाडीवखुर, डॉ. जसराज गिरे, अभि राजू गुंदेशा, जयवंत भाटले यांच्यासह नगरसेवक व हजारो मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. महादेव यात्रा उत्सव कमिटी अध्यक्ष सुनिल पाटील, हालशुगर संचालिका गीता पाटील यांनी भाविकांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
——————————————————————–
शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन
रथोत्सव झाल्यानंतर शुक्रवारी (ता.२०) रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *