Sunday , September 8 2024
Breaking News

एस. पी. ग्रुप राजमनी चॅम्पियन्स फुटबॉल स्पर्धेचा मानकरी

Spread the love

रोमहर्षक सामने : मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

निपाणी (वार्ता) : येथील निपाणी फुटबॉल अकॅडमी व राजमनी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रीमियर लीग २०२२ च्या फुटबॉल सामन्यांचे रोमहर्षक सामने येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या पटांगणावर झाले. अंतिम सामना निपाणी महादेव मंदिर एस. पी. ग्रुप व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रायझिंग स्टार युथ क्लब यांच्यात झाला. यामध्ये एस. पी. ग्रुप संघाने १-० असा विजय मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या संघाला रोख ११ हजार रूपये व राजमनी चॅम्पियन्स ट्रॉफी देण्यात आली. तर उपविजेत्या रायझिंग स्टार युथ क्लब संघास रोख ७ हजारांचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. दोन्ही संघांनी अखेरपर्यंत अप्रतिम खेळ केला.
सामना संपण्याच्या अंतिम टप्यात एस. पी. ग्रुप संघातील खेळाडू शादाब खानने निर्णायक गोल नोंदवला आणि आपल्यासंघाला राजमनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी बनविले. अंतिम सामन्यात पूर्वार्धात दोनही संघाना गोल करता आला नाही. यावेळी उतारार्थात दोनही संघ आक्रमक झाले. दोन्ही संघातील खेळाडू गोल करण्याचे प्रयत्न करीत होते. ४७ व्या मिनीटाला एस. पी. ग्रुपच्या उजवा विंगर गुरुराज कुणकेकर व कर्णधार शुभम देसाईने रचलेले वेगवान चालीवर डाव्या बाजूला खेळणाऱ्या शादाब खानने बचाव फळीला गुंगारा देत अप्रतिम मैदानी गोल नोंदविला. हा अंतिम डावातील विजयी गोल ठरला.
यावेळी बेस्ट फॉरवर्ड गजेंद्र सावंत, बेस्ट गोलकिपर राहुल राजपुरोहीत, बेस्ट मिडफिल्डर सारंग देसाई, बेस्ट फुलबॅक सोमनाथ पाटील, मॅन ऑफ दि मॅच करण माने, मॅन ऑफ द सीरीज शुभम देसाई यांना देण्यात आली.
यावेळी समर्थ मंडळ व्यायाम शाळेचे अध्यक्ष धनंजय मानवी , डॉ. नितीन शाह, राजेश कदम, पंकज पाटील, रोहन साळवे, सोमनाथ शिंदे, प्रतिक शाह, सौरभ शहा, राजेश देसाई, इक्बाल तोरगल, विलास फुटाणकर व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. निपाणी फुटबॉल अकॅडमीचे सचिन फुटाणकर म्हणाले, राजमनी ग्रुपचे प्रतिक शहा यांनी निपाणी व परिसरातील खेळाडूंना त्यांच्या खेळातील कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. पुढील काही अखिल भारतीय फुटबॉल सामने खेळवण्याचा आमचा मानस आहे. यावेळी विजेत्या संघाचे सर्वेसर्वा सुनील पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक व फुटबॉल प्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *