Saturday , July 27 2024
Breaking News

शिवाजी नगरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न

Spread the love

बेळगाव : शिवाजी नगर पहिली गल्ली येथे चोरट्यांनी घरात कोणी नसलेले पाहून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मध्यरात्री तीन नंतर ही घटना घडली असून रविवारी सकाळी उघडकीस आली.
शिवाजी नगर पहिल्या गल्लीतील अभय बेळगुंदकर आणि एका घरामध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला मात्र त्यांना कोणतीही मौल्यवान वस्तू हाती न लागल्याने हा चोरीचा प्रयत्न फसला.
शिवाजीनगर सारख्या भर वस्तीतल्या गल्लीच्या मधोमध असलेल्या घरांमध्ये चोरटे प्रवेश करत आहेत मात्र पोलिसांच्या याकडे दुर्लक्ष होत आहे
एकीकडे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्यासाठी गरज आहे मात्र दुसरीकडे जनतेने पण सतर्क रहाण्याची गरज व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभय बेळगुंदकर यांच्या घराचं काम सुरू आहे म्हणून त्यांनी वरच्या मजल्यावर रात्री झोपायला गेले असता घरात कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला चोरीचा प्रयत्न केला.
मध्यरात्री दोन पर्यंत या भागातले लोक जागे असतात त्यामुळे मध्य रात्री तीन नंतर हा चोरीचा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे. मार्केट पोलिसांनी अश्या घटनांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *