Tuesday , March 3 2026
Breaking News

काँग्रेसच्या महत्त्वकांक्षी उपक्रमामुळे भाजपमध्ये पोटशुळ

Spread the love

 

लक्ष्मणराव इंगळे यांचा आरोप ; निपाणीत पत्रकार बैठक

निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारने १ हजार दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. या काळात देशात निवडणुकांमध्ये पंचहमी योजनेची दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारे काँग्रेस हे एकमेव सरकार ठरले आहे.स्वच्छ, पारदर्शी कारभाराने सिद्धरामय्या सरकार नागरिकांच्या मनावर अधिराज्य प्रस्थापित केले आहे. त्याचाच पोटशूळ उठून आपल्या कारकिर्दीत राज्यात अराजकता पसरविणाऱ्या भाजपाने काँग्रेस सरकारबद्दल अपप्रचार करण्याचे काम सुरू केल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केला आहे. निपाणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भुषविणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मंत्रिमंडळाचा पारदर्शी कारभार केल्याने सरकार राज्यात जनप्रिय सरकार ठरले आहे. त्यामुळे येत्या २५ वर्षात पुन्हा सत्ता भोगणे कठीण असल्याचे ओळखलेल्या भाजप सरकार खोटे दिशाभूल करणारे आरोप करीत आहेत. त्यांच्या आरोपांना मतदार भीक घालणार नाहीत. काँग्रेस सरकारने पंचहमी योजना प्रभावीपणे राबवून योजना घरापर्यंत पोहचविल्या आहेत. भाजपच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून त्यांना जनतेने घरी बसवले आहे. जे स्वतः च भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.
काँग्रेस सरकारवर टीका करतांना भारतीय जनता पक्षाने आधी आत्मावलोकन करावे. त्यांनी महिला बालकल्याण मंत्री काळात लहान मुलांच्या पोषण आहारात भ्रष्टाचार केला. अंडी घोटाळा करून लहान मुलांच्या तोंडाचा घास काढूनघेण्याचे काम केले आहे. त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. जात, भाषा, प्रांत भेद न मानता सर्वांना सोबत घेऊन आमच्या सरकारने प्रामाणिकपणे काम केले आहे. निपाणी भागात आमचा भाजपा एकमेव शत्रू आहे. घरकुल योजना साकारण्याचे काम माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या कार्यकाळात सुरु करण्यात आले. ते आज मूर्त स्वरूप घेत आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल वितरण जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात – येईल. निपाणी भागात काँग्रेस पक्षाचीएकजूट असून आगामी काळात शक्तिनिशी पक्षबळकटीचे कार्य करणार असल्याचे चिंगळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवानेते सुजय पाटील, अस्लम शिकलगार, रवींद्र श्रीखंडे, आर. के. धनगर, बाळासाहेब कमते, फारुक पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *