
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील स्थानिक जी.आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयक्यूएसीच्या सहकार्याने विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागां तर्फे सोमवार (ता.२३) ते बुधवार (ता.२५ )फेब्रुवारी अखेर स्वतंत्र विषयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.२३) विज्ञान विभागातर्फे ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उदयोन्मुख ट्रेंड्स’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन केएलईचे संचालक प्रवीण बागेवाडी यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ गजानन राशिंगकर आणि स्थानिक प्रशासकीय मंडळाचे सदस्य रवींद्र शेट्टी हे पाहुणे म्हणून म्हणून उपस्थित राहतील.अध्यक्षानी प्राचार्य डॉ. एम.एम. हुरळी हे उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी (ता.२४) ‘विकसित भारत २०४७: प्रगती, नवोन्मेष आणि समानतेसाठी धोरणे’या विषयावर कला विभागां तर्फे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित होईल. त्याचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी मुख्य सचेतक आणि केएलईचे संचालक महांतेश कवतागीमठ यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे दावणगेरी विद्यापीठाचे कुलपती प्रा. बी. डी. कुंभार, बेळगावचे डॉ. बी. जी. पाटील आणि स्थानिक प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष महेश बागेवाडी यांचे प्रमुख उपस्थिती राहील.बुधवारी (ता.२५) वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातर्फे ‘वाणिज्य आणि व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण पद्धती’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन येथील एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते होईल. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. बी.एस. नवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तीन दिवसांच्या या
तीन दिवसातील चर्चासत्रात विद्यार्थी, व्याख्याते आणि संशोधकांसाठी ज्ञान संपादन आणि संवादासाठी एक चांगले व्यासपीठ असेल. विविध विभागातील समन्वयक आणि आयोजकांच्या प्रयत्नांनेहा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध राज्यांतील प्राध्यापक, विद्वान आणि ३०० हून अधिक संशोधन लेख सादर होणार आहेत. प्रकाशित लेखांचे पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. परिषदेच्या दिवशी नोंदणीलाही परवानगी असेल. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सभागृहात हा कार्यक्रम होणार असल्याचे प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी यांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन परिपूर्ण महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमा चिक्कमठ, आयक्यूएसी समन्वयक डॉ. ए. ए. कांबळे, डॉ. एस. एम. रायमाने, शंकरमूर्ती के. एन.,डॉ बसवराज जनगौड डॉ. आनंद केनंचेकनवर, प्रा. बी. जी. उळागड्डी यांनी केले आहे.
——
Belgaum Varta Belgaum Varta