
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्पर्धा झाल्या. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.त्यानंतर महाशिवरात्री यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्री सोहळ्याची महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
सुनिल पाटील, शेखर नणदीमठ दांम्पत्य, केएलईचे संचालक अमर बागेवाडी, रविंद्र कोठीवाले, संजय मोळवाड, रविंद्र चंद्रकुडे यांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन झाले. त्यानंतर महादेव मंदिर सांस्कृतिक भवन, महादेव मंदिर परिसर आणि वीरशैव बँकेच्या समोरच्या बाजूस अशा चार ठिकाणी महिला, पुरुष भाविकांच्या महाप्रसादाची सोय केली होती. यावेळी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मंदिरात आकर्षक पूजा बांधली होती. महाप्रसादासाठी गणेशउत्सव मंडळ, एस.पी. ग्रुप, गणेश हेल्थ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta