Tuesday , March 3 2026
Breaking News

सहकारी संस्थामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणला बळ

Spread the love

 

बसवप्रसाद जोल्ले; ‘शांतीसागर’च्या शाखेचे माणकापुर उद्घाटन

निपाणी (वार्ता) : भारत हा कृषिप्रधान देश असून ७० टक्के नागरिक शेती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास देशाची प्रगती होणार आहे. तो आर्थिक दृष्ट्या प्रबळ तो पुढे जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकरी बांधवांना त्यांचे शेती उत्पन्न वाढवण्यास आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष शरद जंगटे यांनी बोरगावात आचार्य श्री १०८ शांतीसागर संस्थेची स्थापना केली. त्यामुळे मानकापूरसह परिसरातील शेतकऱ्याच्या आर्थिक विकासाला बळ मिळणार असल्याचे मत जोल्ले उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष व बसवज्योती युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. माणकापूर येथे संस्थेच्या पहिल्या शाखेच्या प्रारंभप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत ते होते.
व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक व हालशुगर संचालक,नगरसेवक शरद जंगटे, हालशुगर संचालक रामगोंडा पाटील, युनुस मुल्लानी, पंचगंगा साखर संचालक महावीर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बसवप्रसाद जोल्ले यांनी फित्त कापून संस्थेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे शेती अधिकारी नामदेव बन्ने स्वागत यांनी केले. संस्थेचे संस्थापक शरद जंगटे यांनी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था उभारणीस संचालकांनी वेळोवेळी योगदान दिले आहे. संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवूनठेवीदारासह सभासदांनी केलेल्या व्यवहारामुळे संस्थेने सहकार क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. शाखा शुभारंभादिवशीच शाखेत २ कोटीच्या ठेवी जमा झाल्याचे सांगितले.
यावेळी हालशुगर संचालक रामगोंडा पाटील, युनुस मुल्लानी, उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ, सुकुमार चौगुले, बी.के महाजन, राजू उरुणकर, विठोबा कुंभार, सर्जेराव माळी, आशुतोष मोरे, अभिनंदन वलशेट्टी, सुरेश पाटील, विजय पाटील, प्रमोद आरगे, कलगोंडा पाटील, शिवराम मोरे, शंकर माळी, सुजाता चौगुले, जितू पाटील, अजित तेरदाळे, बंडू माळी, धवल भिवरे, महावीर बंकापुरे, भूपाल महाजन, रमेश सातपुते यांच्यासह सभासद व कर्मचार उपस्थित होते. अजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रधान व्यवस्थापक वैभव कुंभार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *