Sunday , July 26 2026
Breaking News

कर्जबाजारी युवा शेतकऱ्याची बेनाडीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : भाजीपाला आणि फुलशेती करणाऱ्या कर्जबाजारी युवकाने शेतकऱ्याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.२६) सकाळी आत्महत्या केल्याची घटना बेनाडी (ता.निपणी) येथे उघडकीस आली आहे. कल्लाप्पा आप्पासाहेब चौगुले (वय ४५) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कल्लाप्पा चौगुले हे अनेक वर्षापासून फुल शेती व भाजीपाला शेती करीत होते. सध्या त्यांनी आपल्या शेतामध्ये फुलांची रोपे लावली होती. दररोज त्याची तोड करून निपाणी येथील फुल मार्केटला फुले देत होते. पण दरातील चढ उतारामुळे त्यांची ही शेती तोट्यात येत होती. त्यामुळे ते काही दिवसापासून अस्वस्थ होते. बुधवारी (ता.२५) रात्री आपल्या दुचाकीनी ते दूध संघाला दूध घालण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते थेट आपल्या शेताकडे जाऊन बाजूला असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत कल्लाप्पा हे घरी परत मिळाल्याने कुटुंबीय मित्रमंडळींनी गावासह नातेवाईकाकडे चौकशी केली. पण ते आढळून आले नाहीत.
गुरुवारी (ता.२५) पहाटे त्यांच्या शेतजमिनी शेजारी असलेला शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी शेताकडे गेले असता त्यांना कल्लाप्पा चौगुले हे झाडाला दोरी लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती चौगुले कुटुंबीयांना दिली. त्यानंतर चौगुले कुटुंबीयांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्याची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानुसार उपनिरीक्षक व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येथील गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर चौगुले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कल्लाप्पा चौगुले यांनी शेतीसाठी सरकारी व खाजगी बँकेतून कर्ज घेतले होते. पण त्याची वेळेवर परत फेडणे झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मृत कलाप्पा चौगुले यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्या घटनेल्यामुळे बेनाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *