निपाणी (वार्ता): येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर गुरुवारी (ता.३) रथोत्सव साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत निघालेला हा उत्सव पाहण्यासाठी निपाणी शहर परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता.६) दुपारी महाप्रसाद वाटपाने महाशिवरात्री सोहळ्याची सांगता करण्यात आली.
प्रारंभी राजू ननदीमठ दाम्पत्यांच्या हस्ते खिरीच्या काहिलीची पूजा करण्यात आली. त्यानंतर महाशिवरात्री उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या हस्ते नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी महिलांनी आंबोलीच्या घागऱ्या आणल्या होत्या.
कार्यक्रमास अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, रवींद्र कोठीवाले, संजय मोळवाडे, समीर बागेवाडी, महेश बागेवाडी, बाबासाहेब चंद्रकुडे, प्रमोद पणदे, कल्लाप्पा खोत, रवींद्र चंद्रकूडे, बाळ बाळेक्कानावर, डॉ. महेश ऐनापुरे, महेश दुमाले, मल्लीकर्जून गडकरी, रवींद्र शेट्टी, सदाशिव चंद्रकुडे, सुरेश शेट्टी, संजय कोठीवाले, महेश दुमाले, शेखर चंदूरे, वज्रकांत सदलगे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …