निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संस्कृती भावनात रविवारी (ता.१ मार्च) धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या सहकाऱ्यांनी या परिषदेची तयारी पूर्णत्वाकडे आले असून शहर व परिसरातील समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सुधाकर माने यांनी केले आहे.
परिषदेत प्रमुख व्यक्ते म्हणून आंबेडकरी विचाराचे गाढे अभ्यासक ‘जग बदलणारा बाप माणूस’ या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहाळ व विचारवंत डॉ. अच्युत माने हे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उत्तर कर्नाटकाचे अध्यक्ष मनोहर मोरे हे आहेत. धम्म ध्वजारोहण माजी आयएएस अधिकारी शंभो कल्लोळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भटकळ येथील तहसीलदार प्रवीण कारंडे, भारतीय बौद्ध सभेचे अध्यक्ष सिद्धराजू, मल्लिकार्जुन भालके यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे कर्नाटकातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या धम्म परिषदेत भंते नवापाल भालकी व भंते ज्ञानज्योती बेळगाव हे धम्म देशना देणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून भव्य धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेसाठी निपाणी व परिसरातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व धम्म बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शताब्दी महोत्सव कमिटी व धम्म परिषदेचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta