Tuesday , March 3 2026
Breaking News

विज्ञानाच्या प्रसारासाठी २५ वर्षापासून धडपडणारा अवलिया शिक्षक

Spread the love

 

निपाणीतील एस. एम.नदाफ यांचे कार्य ; आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग

*राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष*

निपाणी : विनायक पाटील (वार्ता) : विज्ञानाच्या सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. बालपणापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना विविध स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची संधी दिली पाहिजे. शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत. यासाठी गेल्या २५ वर्षापासून विज्ञानाचा प्रचार व प्रसारासाठी डोंगराळ भागातील पांगिरे (बी.) शाळेतील विज्ञान शिक्षक एस. एम. नदाफ हे धडपडत आहेत.
सरकारी मराठी मुलांची शाळा पांगिरे बी येथील शाळेत नदाफ हे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी व त्यांना विज्ञानाची तत्वे सहजरित्या समजण्यासाठी ‘विज्ञानवारी शनिवारी’ हा उपक्रम गेल्या २० वर्षापासून राबवत आहेत. साध्या वस्तूमध्ये विज्ञान कसे लपलेली आहे, हे प्रयोगातून दाखविण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. विज्ञान वस्तू प्रदर्शन, विज्ञान रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, इन्स्पायर अवार्ड स्पर्धा, आकृती रेखाटन स्पर्धा असे उपक्रम प्रभावीपणे राबवत आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभाग होण्याची संधी प्राप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. केंद्र शासनाच्या इन्स्पायर योजनेअंतर्गत २०१० पासून १५ विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. शिक्षकांसाठी आयोजित विज्ञान प्रदर्शनात जिल्हा व राज्यस्तरावर त्यांनी यश संपादन केले आहे. निपाणी परिसरातील अनेक शाळांमध्ये विज्ञानाचे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा ते सतत प्रयत्न करत आहेत. कुर्ली येथे दरवर्षी होणाऱ्या ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलनाचे सक्रिय सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून विज्ञानाच्या आधारे ग्रामीण भागातील बुवाबाजी नष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याचे दखल घेऊन आजपर्यंत त्यांना विविध पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
—————————————————————–
‘ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. त्यामुळे विज्ञानाचा आधार घेऊन त्यांना कशाप्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन करता येईल याबाबत वीस वर्षापासून मार्गदर्शन करत आहे. कठीण असलेले विज्ञान सरळ साध्या सोपे विद्यार्थ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.’
-सलीम नदाफ, विज्ञान शिक्षक, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *