Sunday , July 26 2026
Breaking News

मातृभाषेतून शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो.. मान्यवरांनी व्यक्त केली मातृभाषेतून शिक्षणाची गरज

Spread the love

 

गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधनीच्या वतीने मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

बेळगाव : गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने 27 फेब्रुवारी हा कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ कल्चर या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रबोधनीचे सदस्य व नाट्यकर्मी अनंत जांगळे यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्री. इंद्रजित मोरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. यानंतर मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये बेळगावचे उद्योजक सोनाली व जयदीप बिर्जे , सीए ओंकार सुतार व अक्षता सुतार त्याचबरोबर युवा उद्योजक राहुल व अक्षता पाटील या दांपत्यानी भाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ ही लघु नाटिका सादर करण्यात आली. अंकिता कदम व शिवानी गायकवाड या मराठी विद्यानिकेतनच्या माझी विद्यार्थिनींनीसह अभिनय ही नाटिका सादर केली. याचे दिग्दर्शन व लेखन प्रसाद सावंत यांनी केले होते. यानंतर संगीत विभागाने उषःकाल होता होता व कवी नारायण सुर्वे यांचे ‘डोंगरी शेतमाझे’ ही गीते सादर केली. नारायण सुर्वेंच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना या गीतातून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत श्री सुभाष ओऊळकर यांनी केले. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सुभाष ओऊळकर यांनी केला. यावेळी दोन विशेष सत्कार ही करण्यात आले. बेळगावचे जीएसटी विभागाचे जॉईंट कमिशनर आय.आर.एस आकाश चौगुले व कॉन्टॉनमेंट बोर्डचे सीईओ सुदाम मंचलवार यांचा मातृभाषेतून शिक्षणाच्या प्रसाराबद्दल सन्मान करण्यात आला. या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून त्यांची मुले आज मराठी माध्यमातून शिकत आहेत. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मराठी माध्यम माझी यशोगाथा या परिसंवादा अंतर्गत श्रीमती सविता पवार व नीला आपटे यांनी जयदीप व सोनाली बिर्जे, अक्षता व राहुल पाटील आणि अक्षता व ओमकार सुतार यांची प्रकट मुलाखत घेतली. व त्यांच्या एकंदरीत शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाविषयी जाणून घेतले. या सर्वांनी मराठी माध्यमातून शिकल्यामुळे त्यांना कोणता फायदा झाला, मराठी माध्यमाविषयी असलेले गैरसमज न्यूनगंड, मराठी माध्यमातून व्यवसायाच्या संधी, येणाऱ्या काळातील आव्हाने या संदर्भात आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाला प्राचार्य आनंद मेणसे, श्री. बाळाराम पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, डॉ. पी.डी काळे, शंकर चौगुले, किरण पाटील. प्रा. सुरेश पाटील, अशोक जांभळे, विजय बोंगाळे, याचबरोबर बेळगाव मधील मराठी भाषा प्रेमी नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक व मराठी विद्यानिकेतनचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मराठी विद्यानिकेतनच्या माझी विद्यार्थिनी अंकिता कदम व शिवानी गायकवाड यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *