
निपाणी (वार्ता) : कामगार मंत्री संतोष लाड फाउंडेशन आणि निपाणी तालुका मराठा समाजाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ११ युवकांना येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात रिक्षांचे वितरण करण्यात आले. बेळगाव येथील जयराज हलगेकर, अविनाश नलवडे आणि मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. हलगेकर यांच्या हस्ते रिक्षांचे पूजन करून लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
जयराम हलगेकर यांनी, सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले आहे. त्यांच्या स्वाभिमानाची प्रेरणा घेऊन मराठा समाजातील युवकांनी स्वावलंबी बनावे. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहत कुटुंब व समाजाची आर्थिक प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील यांनी फाउंडेशनतर्फे शैक्षणिक व इतर सवलतींचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, गोपाळ नाईक, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी, जयराम मिरजकर, बाळासाहेब देसाई, माजी नगरसेवक रविंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सुजय पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, मराठा बँकेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण माजी सभापती किरण कोकरे, माजी नगरसेवक अरूण आवळेकर, सुनील हिरुगडे, दीपक वळीवडे, विनोद बल्लारी, दीपक सावंत, संदीप चावरेकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta