Sunday , July 26 2026
Breaking News

खेळामुळे मानसिक विकासाला प्रेरणा; शिवानी भोसले

Spread the love

कुर्ली हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण

निपाणी (वार्ता) : शालेय पातळीवर क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे सकारात्मक भावनांना प्रेरणा मिळते. खेळामुळे ताण कमी होवून मानसिक विकास होण्यासाठी चालना मिळते, असे मत चिखली येथील नूतन जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्कूल बेटरमेंट कमिटी अध्यक्ष अरुण निकाडे होते.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झालेबद्दल शिवानी भोसले यांचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. ए. ए‌. चौगुले यांनी पारितोषिक वितरणाच्या अहवालिचे वाचन केले. शिवानी भोसले म्हणाल्या, जिद्द, चिकाटी व सरावातील सातत्य यामुळे यश मिळते. अपयशाने खचून न जाता पुढील स्पर्धेसाठी तयारी ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्वरूप पाटील व भाग्यश्री लोहार यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वैयक्तिक व सांघिक खेळात यश संपादन केलेल्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी श्रीनिवास पाटील, के. डी. पाटील, विश्वनाथ पाटील, नामदेव निकाडे, शिवाजी चौगुले, नानासाहेब पाटील, सीताराम चौगुले, राजाराम पाटील, के. ए. नाईक, एस. एस. देसाई, एम. बी. खिरुगडे, एम. एस. वाळके यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. टी. एम. यादव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *