Monday , September 21 2026
Breaking News

चर्मकार समाज वधू – वर सूचक मेळाव्याला धारवाडच्या जिल्हाधिकारी आर स्नेहल यांना निमंत्रण

Spread the love

 

धारवाड – बेळगाव येथील प्रोत्साह फाउंडेशन वतीने चर्मकार (समगार) समाजाच्या वधू – वर सूचक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला धारवाडच्या जिल्हाधिकारी आर स्नेहल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
चर्मकार (समगार) समाजाच्या बेळगाव येथील प्रोत्साह फाउंडेशन पदाधिकाऱ्यांनी धारवाडच्या जिल्हाधिकारी आर स्नेहल यांची भेट घेतली आणि त्यांना वधू – वर सुचक पालक परिचय मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी त्यांचा प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने बुद्ध बसव आंबेडकरांची प्रतिमा (फोटो), शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी आर स्नेहल यांनीही मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमणी, अण्णासाहेब रायमाने, प्रा‌. चंद्रकांत वाघमारे, संतोष होंगल, सुरेश सांगली, शंकर कांबळे, रवी होंगल, हिरालाल चव्हाण, संजय चौगुले आदी कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *