Sunday , July 26 2026
Breaking News

निरोगी जीवनासाठी व्यसनापासून दूर राहा

Spread the love

 

‘महात्मा बसवेश्वर’ मध्येआरोग्य शिबिर : रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी ( वार्ता) : तान, तणावासह आहारातील बदलामुळे नवनवीन आजार निर्माण होत आहेत. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येत आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. निर्व्यसनी राहून विवासनावर भर देणे गरजेचे असल्याचे मत डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. येथील महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते. कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाधी मठातील मठाधिपती प्राणलिंग स्वामी होते.
प्रारंभी प्रणालींग स्वामी आणि संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी प्राणलिंग स्वामी यांनी, धकाधकीच्या जीवनामुळे आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याचे काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शिबिरात नेत्ररोग, हृदयविकार, अस्थिरोग, मज्जरोग, स्त्रीरोग, कृत्रिम गर्भधारणे बाबत २०० रुग्णांची तपासणी औषधोपचारासह मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. शिवम माने, डॉ. आरती माने, डॉ. धीरज मोहिते, डॉ .वैष्णव पाटील, डॉ. नुपूर पोवार यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
शिबिरास संचालक सुरेश शेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमने, प्रताप पट्टनशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के. अदनावर, भद्रश फुटाणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव आणि राजेंद्र मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. सुरज घोडके यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *