Tuesday , March 3 2026
Breaking News

सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव परिसरात विविध उपक्रम

Spread the love

 

बोरगाव (वार्ता) : सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अरिहंत उद्योग समूह आणि उत्तम पाटील युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव आणि परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले. मतदारसंघातील उत्तम पाटील प्रेमी नागरिकांनी त्यांना वाढदिवसानिमित्त बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त केल्या.
वाढदिवसाचे औचित्य साधून बोरगाव येथील आर. के. नगर आणि अरण्य सिद्धेश्वर मंदिरासमोर ओपनलिकेची खुदाई करण्यात आली. महिलांच्या हस्ते विद्युत मोटारीचे पूजन करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यावेळी उत्तम पाटील यांचा आर.के. नगर आणि सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मानकापूर येथील गरजू कुटुंबांना उत्तम पाटील यांच्या हस्ते गॅस किटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्तम पाटील यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

उद्योजक अभिंनंदन पाटील, नगराध्यक्ष दिंगबर कांबळे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदूम, माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, ममदापूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, सदस्य निरंजन पाटील- सरकार, इम्रान मकानदार, अकोळ ग्रामपंचायत अध्यक्ष, इंद्रजीत सोळांकुरे, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, बेनाडी येथील रवी पाटील, दरिखान आज्जा, सदलगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, साखर कारखाना संचालक चेतन पाटील, उद्योजक सचिन झेले, सुनील म्हाकाळे, वर्धमान पाटील, लक्ष्मण कांबळे, इंद्रजीत पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे, अरविंद वाडे, धनाजी चौगुले, बाळासाहेब पाटील, दिगंबर कांबळे, रामचंद्र चौगुले, राहुल पाटील, शरद कुमार पाटील, शरदचंद्र पाठक, आप्पासाहेब पाटील, पिरगोंडा पाटील, संजय देसाई, सतीश पाटील, केदार कुलकर्णी, रामगोंडा पाटील, शिवानंद पाटील यांच्यासह माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, उत्तम अण्णा युवाशक्तीचे पदाधिकारी, युवक मित्र, महिला, ग्रामस्थांनी उत्तम पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

होळी, रंगपंचमी, रमजान ईद काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

Spread the love  निपाणी (वार्ता) : रमजानचे उपवास सुरू झाले असून मुस्लिम बांधवांची रात्री उशिरापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *