
निपाणीत कार्यकर्त्यातर्फे हृद्य सत्कार
निपाणी (वार्ता) : कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि मतदारांच्या पाठिंब्यामुळे निपाणी मतदारसंघाची नाळ जुळली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण कोणत्याच नेतेमंडळींची साथ नसताना विधानसभा निवडणूक लढवली. निवडणूक लढविली. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि नागरिकांच्या पाठिंबामुळे द्वितीय क्रमांकाची मते मिळाली. पराभव झाला तरी खचून न जाता कोणतीही सत्ता नसताना त्याच वेगानेगे मतदारसंघात कार्य सुरू आहे. आपला कार्यकर्ता कुणाच्याही दाराला जाऊ नये याची खबरदारीती घेत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्त्व देऊन कार्यरत राहण्याची ग्वाही सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली. वाढदिवसानिमित्त निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकातर्फे येथील अरिहंत संस्थेत आयोजित सत्कार स्वीकारून ते बोलत होते.

उत्तम पाटील म्हणाले, यश अपयशाने खचून न जाता मी लढणारा कार्यकर्ता आहे. यापुढेही कार्यकर्त्यांसाठी मी सदैव कार्यरत राहणार असून शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी मी व माझे बंधू अभिनंदन पाटील सदैव कार्यतत्पर आहे.
सामाजिक जीवनात कार्य करताना जात, पात, पक्ष भेदभाव न करता सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले आहे. वडील दिवंगत रावसाहेब पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाश्वत विकासाची दूरदृष्टी मनाशी बाळगून सहकार, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य कला, क्रीडा क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करीत आहे. अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून विकास साधला आहे. यापुढेही पाटील कुटुंबीयांवर सर्वांचे प्रेम आपुलकी आशीर्वाद राहील अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्या संवर्धक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, डॉ. विनय निर्मळे, सतीश पाटील, गाव कामगार पाटील राजू पाटील, गोपाळ नाईक, रवींद्र शिंदे, राजेंद्र कंगळे, सचिन गारवे, ग्रामपंचायतसदस्य निरंजन पाटील-सरकार, ग्रामपंचायत उपाध्यक्ष, गजानन कावडकर, रघुनाथ चौगुले, प्रा. डॉ. अच्युत माने, विनायक वडे, प्रकाश गायकवाड, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, शंतनू मानवी, इम्रान मकानदार, शिरीष कमते, शशीकुमार गोरवाडे, महेश पाटील, दिलीप पठाडे, शौकत मणेर, सुंदर पाटील, नितीन नेपिरे, विनोद बल्लारी, दत्ता नाईक, ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजित सोळांकुरे, युवराज पाटील, रविराज पाटील यांच्यासह निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते व उत्तम पाटील प्रेमी नागरिकांनी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
Belgaum Varta Belgaum Varta