Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love

 

आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता

निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात सोमवारी (ता.२) सायंकाळी भक्तिमय वातावरणात होलिका दहनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी पोळी-दानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला भाविकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शेणी ऐवजी परिसरातील कचरा संकलित करून त्याची होळी करून अनोखा उपक्रम राबविला.
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून बाळाच्या मुली टिमक्या वाजवत शेणी संकलित केल्या होत्या. सोमवारी सकाळपासूनच घरोघरी आणि बालचमुमध्ये होळी सणाची लगबग सुरू होती. सायंकाळी सहा नंतर युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह बाल चिमणी चौका चौकात शेणी रचून त्याच्यामध्ये एरंडाची फांदी लावली होती. होळी रसलेल्या परिसरात महिलांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्यानंतर महिलांनी होळीची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. त्यावेळी अनेक भाविकांनी होळीमध्ये पोळी तर काहींनी हा नैवेद्य गरजूंना दान केला.
मंगळवारी (ता.३) सकाळी बालचमुंनी होळीच्या ठिकाणी असलेली राख एकत्र करून त्यापासून गोळे तयार केले. त्यानंतर गोळे नागरिकांना मारून आनंदोत्सव व्यक्त केला. यावेळी अनुचित प्रकार न घडण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
होळीच्या नंतर आता रविवारी (ता.८) रंगपंचमीचा सण आहे. आतापासूनच बालचमुसह युवकांनी त्याची तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारचे रंग आणि पिचकारी उपलब्ध झाले आहेत. दोन दिवसात त्याच्या खरेदीसाठी गर्दी होणार आहे. यंदा अनेक ठिकाणी पाणीटंचाई सुरू झाल्याने कोरड्या रंगाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *