प्रा. डॉ. अच्युत माने :लिटल अँजलस्कूलचे स्नेहसंमेलन
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. संस्कारमय शिक्षणाची उणीव भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसन्नकुमार गुजर यांनी विविध शाळेच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. याही शाळेची जबाबदारी त्यांनी घेतल्याने शाळेचा नावलौकीक वाढत आहे. मुलांना संस्कारमय शिक्षण देणे काळाची गरज असल्याचे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले.
येथील स्वामी विवेकांनद एज्यूकेशन सोसायटी संचलित
लिटल अँजल कॉन्व्हेन्ट स्कूलच्या वार्षिक उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर तर प्रमुख पाहुणे म्हणून महावीर आरोग्य सेवा केंद्राचे अध्यक्ष प्रकाश शहा, प्रा. डॉ. अच्युत माने, माजी नगराध्यक्ष सुभाष मेहता, गजेंद्र पोळ, सभापती राजू गुंदेशा उपस्थित होते. यावेळी प्रा डॉ. माने बोलत होते.
सभापती राजू गुंदेशा यांनी, लहान मुलांच्यावर लहान वयात संस्कार होणे गरजेचे आहे. लहानपणापासून लहान मुलांच्यात सामाजिक भावना निर्माण करणे गरजेचे आहे. लहानपणातील संस्कार भविष्यात चांगले नागरीक बनवित असल्याचे सांगितले.
अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर म्हणाले, निपाणी परिसरास शैक्षणिक आणि सामाजिक संस्कृतीचा वारसा आहे. तो जपण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे.
प्रारंभी शिक्षिका निलोफर शेख यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. प्राचार्या सुनिता जमादार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रेमा आंबले यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांद्वारे आपल्या कला सादर केल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व पालकांनी मुलांच्या कलेला दाद दिली. कार्यक्रमास एन. आय. खोत, झाकीर कादरी, सुधाकर माने, संतोष करवाळे, किसन दावणे, सुनिल अकोळे, स्नेहल पाटील, सीमा गुजर, गोंविद पोवार, महेश पाटील, चंद्रकात चव्हाण, अनिल मगदूम यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. विजया कांबळे यांनी आभार मानले.