
पंकज पाटील : राष्ट्रीय महामार्गावरील जादा जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून या ठिकाणी असणाऱ्या प्रसाद नर्सरी पासून दूधगंगा नदी पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी या प्रकल्पामध्ये जात आहे. यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे.
आतापर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी होणारा ब्रिज रद्द करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. हा ब्रिज रद्द झाला यांचे आम्ही स्वागत करतो. होणाऱ्या सहापदरी करणाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नसून या ठिकाणी अन्य सरकारी कार्यालयात होणार आहे. याला येथील शेतकऱ्यांचा विरोध असून शेतकऱ्यांची शेतजमीन यामध्ये जात असेल तर त्याला आमचा विरोध राहील. यासाठी येथील शेतकऱ्यांना घेऊन आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिला.
कोगनोळी तालुका निपाणी येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलताना पंकज पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी फाट्यावर होणारा ब्रिज रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. पण याबाबत ठोस कागदपत्रे किंवा जबाबदार व्यक्ती पुढे येऊन सांगत नसल्याने या गोष्टीवर शेतकरी असा विश्वास ठेवतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
येथील प्रसाद नर्सरी ते कोगनोळी दूधगंगा नदी या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती जमीन या प्रकल्पामध्ये जात असल्याचा सर्वे सुरुवातीला करण्यात आला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची जमीन गेल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यावर अनेक बेरोजगार तरुणांनी लाखो रुपयांची कर्ज घेऊन या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. या उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या दुकान व अन्य साहित्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी त्यांनी केली आहे. यामुळे येथील सर्वे अधिकाऱ्यांनी फक्त शेतीचा सर्वे न करता या ठिकाणी असणाऱ्या व्यवसायिक दुकानदारांचा सर्वे करून त्यांनाही नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी यावेळी पंकज पाटील यांनी केली.
या ठिकाणी होणारा ब्रिज व अन्य कार्यालय होऊ नये यासाठी कोगनोळी ग्रामपंचायतीने ठराव करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून देण्याचे काम पहिल्यांदा केले आहे. या ठिकाणी होणारा ब्रिज व रुंदीकरण याची माहिती शेतकऱ्यांना बरोबर मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी होणाऱ्या रुंदीकरण व अन्य गोष्टीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या ठिकाणी होणाऱ्या रस्ता रुंदीकरण मध्ये या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जाणारी जमीन किती याचा देखील खुलासा त्यांनी करावा. त्याचबरोबर या ठिकाणी होणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्रित आणून माहिती द्यावी. या ठिकाणी असणारा फक्त ब्रिज रद्द झाला आहे की दोन्ही बाजूला जाणारी शेती जमीन हे देखील बंद झाले आहे का याची माहिती वरिष्ठांनी ताबडतोब द्यावी. येथील शेतकऱ्यांचा सहा पदरिकरणाला कोणताही विरोध नसून या ठिकाणी होणाऱ्या ब्रिज व अन्य गोष्टीना येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवून या ठिकाणी जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केल्यास आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशाराही पंकज पाटील यांनी दिला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, दिलीप पाटील, आप्पासाहेब माने, मन्सूर शेंडूरे, रामचंद्र वडर, अरुण पाटील, नागेश पाटील, समीर मोमिन, गुंडू कोळी, अजित वठारे, नारायण पाटील, यांच्यासह व्यवसायिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta